Sunday, April 24, 2011

 "plz जरा error बघता का " म्हनत एक सुंदरी आली
बघताच तिच्याकडे  मात्र माझी wicket उडाली
लुक लुक ने तिच्या डोळ्यांचे अन चेहरा तिचा तो हासरा
कधी नव्हे तो आज error इतका सुंदर भासला

लागे आणखीनच सुंदर program चे error निघता
error च्या  बदले सहवास,सौदा काही वाईट नव्हता
लागली मनामध्ये प्रेमाची पालवी फुटाया
आता लागलो मी रोज  तिचे error काढाया

बसत असू आम्ही आज काल canteen ला वेगळे
जळत असती माझे सखे सोबती पलीकडे
भीती कसली आज ह्या ऐरावताला
आज भुंकती ते श्वान ह्या मिजाशाला

पडता पाऊस आज दुख दाटून आले 
संपता project प्रेमही ते संपले
सुखात परत बसता आज ह्या श्वानांन मध्ये
समोरच्या ऐरावताच्या मिजासा नंतरचे मज दुख दिसे.... 

Tuesday, March 29, 2011

ती असली तर ...

समोर निळशार समुद्राच संथ पाणी,आणि संध्याकाळची गार हवा
सर्वदूर शांतता ,आणि माझाच मी एकटा
आणि मनातल सांगायला बाजूला ती असली तर...

एकसंथ बरसणारा पाउस, न्हाऊन निघालेला निसर्ग
पानांची चाललेली कुजबुज, जमिनीवरून वाहणार पाणी
आणि सोबत भिजायला ती असली तर...

काळीभोर रात्र ,आकाशात चांदण्यांची मैफिल
हळूच काजव्यांच चमकण , आकाशाकडे बघत पडलेला मी
आणि सोबत बघायला ती असली तर ...

संकटांचा अंधार ,सर्व वाटा बंद झाल्याचा आभास
एकट झाल्याची जाणीव , खचलेला मी
आणि सोबत धीर द्यायला ती असली तर ...