Wednesday, November 8, 2017

शब्द

ग्रेस ची कविता वाचत बसलो होतो, ग्रेस म्हणजे शब्दांचा खजिना वाटतो नाही का पण का कुणास ठाऊक भाषेमध्ये आणखी शब्द असते तर ग्रेस ला जास्त व्यक्त होता आलं असत ...
भाषा निर्माण कशी झाली असेल , बहुदा  बाळ बोलायला शिकत त्याप्रमाणे काहीशी . मानवाच्या उत्क्रांतीच्या काळात बहुदा  त्याने दिसणाऱ्या आणि सर्वात जास्त गरज असणाऱ्या वस्तुंना शब्द दिले असतील. उदा. पाणी, झाड या सारख्या बऱ्याच  नंतर न दिसणाऱ्या भावना, प्रेम, सुख ,दुःख ..
कवी लेखक हि मंडळी न दिसणारे शब्द देतात काही आपल्याला माहित असलेले आणि काही माहित नसलेले.
   मला जर फुलांचं दोन प्रकार वर्गीकरण कराचे झाल्यास मी वास असलेली फुल आणि  वास नसलेली करेन . पण मी ठरवलं वास असलेल्या फुलांमध्ये वर्गीकर करायचंय तर आहेत का सर्वांसाठी शब्द.... गुलाबाचं वास आणि मोगऱ्याचा वास कसा असतो...
कवीला भावना व्यक्त करायच्या आहेत पण शब्द अपूर्ण आहेत मग कवी काय करतो उपमा देतो नाही का.. मानवी भावनेला निसर्गाशी जोडतो किंवा एका अनुभवाला दुसऱ्या अनुभवाशी आपणही भावनिकरित्या त्याच्याशी जोडली जातो. मी जर उपमा दिली "तीच हास्य हे  खळ्खळ्णार्या झऱ्या सारखं होत" तर ....
   कदाचित आपल्याला अजूनही आपल्या बऱ्याच भावनांचा शोध लागलेला नसेल पण अनुभव नक्की आला असेंन. का माहिती शब्दांच्या पलीकडे खूप मोठं विश्व असेन. आपण जर शब्दानं वातिरिक्त आणाखी दुसरे माध्यम घेतले तर चित्र , संगीत ज्याच्याशी आपण भावनिक रित्या जोडल्या जातो. होत ना कधी कधी एखादी चित्र बघताना गुंग वा संगीत ऐकताना डोळ्यातून असावं येतात , शब्दांच्या पलीकडचं हे विश्व समजण्यासाठी यासारखी माध्यम मदत करतात पण अजूनही बरच काही असेन शब्दानच्या पलीकडच्या  विश्वात. मी ज्या विश्वाबद्दल बोलतोय त्याला एक शब्दच देऊ या कि म्हन्जे व्यक्त व्हयला
सोपं जाईल . आपण त्याला म्हणूया "शविश्व" म्हणजे शब्दांच्या पलीकडचं विश्व. शविश्व म्हणजे तिमिर ज्यात खूप काही दडलंय त्यामध्ये तुम्ही स्वतामधून जाऊ शकता आनी प्रश्नांची उत्तर आणू शकतात. जस काही वर्षांपूर्वी देव धर्म चाली रीती आणल्या गेल्यात . त्यात कदाचित आपल्या अस्तित्वच ,जल्माच, मृत्यूचं तार्किक सत्य  काही युगनानंतर मिळेलहि पण  सोबत नवीन प्रश्नहि मिळतील. जे अस्तित्वापेक्षा हि मोठे असतील कदाचित ... शविश्व हे आपल्याला अनंत मानावं लागेल कारण ते कल्पने
पेक्षाही मोठं आहे. 
प्राण्यांजवळ शब्द नाहीत पण भावना आहेत विरहाचं दुःख त्यांनाही होत आपल्याला हि होत पण बऱ्याच वेळा आपण विचार करून बोलून,जाणाऱ्या व्यक्तीबद्दल जेवढं आहे त्याच्यापेक्षा मोठं नाही करत का म्हणजे मला झालेली भावना मी त्यावेळेला शब्दांच्या अभावी पूर्वपणे व्यक्त पण नसेल करू शकत आणि भावना नसतांना हि आभासी भावना शब्दाने निर्माण करतो.
    अक्षराने शब्द आणि शब्दांनी वाक्य , आपण भावने बद्दल तर बोललो पण विचारांचं काय ? शब्दांना मर्यादा आल्या असतील तर वाक्यांनाही येतील विचारांनाहि  येतील. उद्या बुद्धा ने सांगितल्या प्रमाणे किंवा स्वामी विवेकानंदानी सांगितल्या प्रमाणे मी आत्मज्ञान घेणाच्या प्रयत्न केला तर ते वक्त करू शकेल का ?
आणि जे ज्ञान शब्दांनी बांधलेलं आहे ,असे शब्द ज्यांना मर्यादा आहे ते खूप तोडकं नसेल कशावरून. बुद्धा ला स्वामी विवेकानंदांना जे समजलं ते पूर्ण व्यक्त कदाचित करताही आलं नसेल. अजून बराच काही असेन कदाचित आपण सर्व असत्यताही जगात असू . कदाचित आपण खुप कमी ज्ञानावर आभासी असं सत्य निर्माण केलाय आणि जगतोय. देव निर्माण केलाय धर्म निर्माण केलेयेत जगण्याचे नियम घालून दिलेत काय सत्य काय असत्या काहीच माहित नसताना प्रत्येकाने प्रत्येकाच्या तर्काने आभासी असं सत्य निर्माण केलाय ....आणि निर्माण केलेत प्रश्न न विचाराने लोक, हे केलं तर चूक ते केलं तर वाईट पण का हे प्रश्नच संपलेयेत. आपण म्हणत नाही का टर्रेरिस्ट ब्रेन वॉश केल्याने निर्माण झालेत. आपणही कशाने ना कशाने ब्रेन वॉश नाही झालोत का ? प्रत्येका वर कसल्या ना कसल्या  विचारांचा पगडा आहेच आणि असे विचार जे कुठूनतरी वाचलेले ऐकलेले किंवा आपण म्हणू भोवतालचे अनुभवांचे... मरेपर्यंत नाही का वाटत असत्यात जगतोय. नवीन शब्द नवीन विचार नवीन मार्ग शोधन कठीण असेन का... सध्या तरी आपण जे आभासी जग निर्माण केलाय त्याच्या मध्ये वर्षानु वर्षे तार्किक प्रमाणात बदल घडवतोय पण अजूनही रोजच्या जीवनात तर्काला विसंगत अश्या गोष्टी सापडता आहेत. म्हणजे अजून खूप मोठा बदल व्हायचंय जे असत्य आहे त्यातच... सुरवात तर देवाच्या धर्माच्या आणि जगण्याच्या अस्तित्व पासून  सुरुवात होते नाही का.. हेच मुळात असत्य असल तर
हो आणि ज्याने हे सर्व तर्क केलेयेत त्याला सांगायचं काय होत आणि  त्याच इंटरप्रेटेशन  काय झालं  हा एक वेगळा मुद्दा...       
     कदाचित हे सर्व बदलेल..  उद्या परत कोणी बुद्ध येईल एक आणखी नवा तर्क मांडेल आणि आपण थोडं का होईना शविश्वात  जाऊ ...

Sunday, April 24, 2011

 "plz जरा error बघता का " म्हनत एक सुंदरी आली
बघताच तिच्याकडे  मात्र माझी wicket उडाली
लुक लुक ने तिच्या डोळ्यांचे अन चेहरा तिचा तो हासरा
कधी नव्हे तो आज error इतका सुंदर भासला

लागे आणखीनच सुंदर program चे error निघता
error च्या  बदले सहवास,सौदा काही वाईट नव्हता
लागली मनामध्ये प्रेमाची पालवी फुटाया
आता लागलो मी रोज  तिचे error काढाया

बसत असू आम्ही आज काल canteen ला वेगळे
जळत असती माझे सखे सोबती पलीकडे
भीती कसली आज ह्या ऐरावताला
आज भुंकती ते श्वान ह्या मिजाशाला

पडता पाऊस आज दुख दाटून आले 
संपता project प्रेमही ते संपले
सुखात परत बसता आज ह्या श्वानांन मध्ये
समोरच्या ऐरावताच्या मिजासा नंतरचे मज दुख दिसे.... 

Tuesday, March 29, 2011

ती असली तर ...

समोर निळशार समुद्राच संथ पाणी,आणि संध्याकाळची गार हवा
सर्वदूर शांतता ,आणि माझाच मी एकटा
आणि मनातल सांगायला बाजूला ती असली तर...

एकसंथ बरसणारा पाउस, न्हाऊन निघालेला निसर्ग
पानांची चाललेली कुजबुज, जमिनीवरून वाहणार पाणी
आणि सोबत भिजायला ती असली तर...

काळीभोर रात्र ,आकाशात चांदण्यांची मैफिल
हळूच काजव्यांच चमकण , आकाशाकडे बघत पडलेला मी
आणि सोबत बघायला ती असली तर ...

संकटांचा अंधार ,सर्व वाटा बंद झाल्याचा आभास
एकट झाल्याची जाणीव , खचलेला मी
आणि सोबत धीर द्यायला ती असली तर ...